breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाग्रस्त रहिवाशी आणि होम क्वारंटाईन नागरिकांच्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

कोरोना (कोविड १९) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या निवासाचे इमारतीमध्ये तसेच सदर इमारतीच्या १ कि.मी. परिसरामध्ये सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच, परदेशातून प्रवास करुन आलेल्या व Home Quarantine करण्यात आलेल्या नागरिकांचे निवासाचे इमारतीमध्ये व परिसरामध्ये देखील सोडिअम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्स औषधाची फवारणी करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत अनेक नागरिकांमार्फत त्यांचे निवासी इमारतीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी करण्याचा आग्रह करण्यात येत आहे. तसे अनेक नागरिक दुरध्वनीवरुन आरोग्य विभागाकडे मागणी करत आहेत. तसेच, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांचे सहा.आरोग्याधिकारी यांचेकडेही याबाबत मागणी केली जात आहे. तथापि, कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांचे इमारतीमध्येच प्राधान्याने फवारणी करण्यात येत आहे. जेणेकरुन त्या परिसरामध्ये कोठेही विषाणू असल्यास तो नष्ट करण्यास मदत होईल व उर्वरित परिसरात सदर विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येईल. त्याव्यतिरिक्त इतर परिसरामध्ये औषध फवारणी आवश्यकतेनुसार करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी भितीपोटी अथवा घाबरुन जाऊन औषध फवारणी करण्याची मागणी करु नये. अनियोजित स्वरुपात फवारणी करुन त्याचा योग्य परिणाम देखील होणार नाही, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

तरी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता घराबाहेर पडू नये. तसेच, वारंवार हात स्वच्छ धुवावे. सर्दी, ताप अथवा खोकल्याची लक्षणे दिसल्यास नजीकच्या शासकीय अथवा मनपा रुग्णालयमध्ये त्वरित उपचार घ्यावेत.

नागरिकांनी औषध फवारणीकरिता नाहक आग्रह धरु नये अथवा मागणी करु नये. ज्या इमारतींमध्ये संशयित अथवा परदेशातून नागरिक आलेले आहेत, अशा परिसरामध्ये महापालिकेमार्फत औषध फवारणीचे नियोजन करण्यात आलेले असून त्याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button