कोरेगाव-भिमा शौर्यदिन; समाज कंटकांवर पोलिसांची करडी नजर
पुणे |महाईन्यूज|
कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभावर शाैर्यदिनानिमित्त प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे. पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, बस सेवा, सभा ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाची वाढती संख्या लक्षात घेता 16 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, पार्किंगपासून विजयस्तंभ आणि वढु येथे जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध, यावेळी समाजकंटकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. यासंबंधी परिसरात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी नोटीस देण्यात आहेत.
विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा होताना मागील काळात काही त्रूटी राहिल्या होत्या. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यावर प्रशासनाकडून कुठलीही त्रूटी राहणार नसून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
शौर्यदिन साजरा करताना सोशल मिडीयावर पोलिसांची करडी नजर रहाणार आहे. यावेळी आक्षेपार्ह पोस्ट, भडकावू भाषण, किंवा तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण राबविण्यात येणार आहे, असे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं.