breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सोन्याच्या दागिन्यांसाठी उद्यापासून हॉलमार्किंग! नियम मोडणाऱ्यांना दंड

नवी दिल्ली – सोन्याच्या दागिन्यांसाठी उद्या, बुधवारी १ डिसेंबरपासून हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या सर्व नियमांचे पालन करणे ज्वेलर्सना बंधनकारक आहे. यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना शुद्ध सोन्याची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६ जून २०२१ पासून ते बंधनकारक करण्यात आले होते. परंतु ज्वेलर्सनी त्याला विरोध केल्यामुळे त्याची अंमलबजावणी ३० नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकली होती. मात्र आता उद्यापासून हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व ज्वेलर्सनी याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग लागू आहे. जून २०२२ पासून संपूर्ण देशात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात येणार आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या वाढत्या संक्रमणाचा धोका असल्यामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button