महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या मालवाहतूक गाडीचे चाक घसरले

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकाळी ७.१0 मिनिटांनी पुन्हा चाक बदलून ती गाडी मार्गस्थ केल्यानंतर सकाळी ७.३0 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा मार्गस्थ झाली. त्यानंतर सर्व वाहतूक पुर्ववत झाली.

कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी आणि नांदगावच्या दरम्यान, शनिवारी सकाळी माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन रेल्वेचे एक चाक रूळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग बंद झाला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

पहाटे ४.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटना घडल्यानंतर कोकण रेल्वेच्या संबंधित यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेत रूळावरून घसरलेले चाक अथक प्रयत्न करून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काम पूर्ण करून पुन्हा चाक बसविले आणि ती गाडी मार्गस्थ केली.

यानंतर सकाळी ४.४५ पासून बंद असलेली कोकण रेल्वे ७.३५ वाजता पूर्वव्रत झाली. यावेळी रत्नागिरीकडून मडगावकडे जाणारी पॅसेंजर गाडी पहिल्यांदा या मार्गावरून धावली. त्यानंतर या मार्गावर तीन तास विविध स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्या हळू-हळू मार्गस्थ करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button