breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

केईएमच्या ईसीजी बिघाडप्रकरणी चौकशी समिती

मुंबई:- केईएम रुग्णालयातील ईसीजी यंत्रणेत बिघाड झाल्याप्रकरणी पालिकेने चौकशी समिती नेमली आहे. दरम्यान या घटनेमध्ये होरपळलेल्या चार महिन्यांच्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

केईएमच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर याला हृदयविकारासाठी बुधवारी दाखल केले होते. वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आणलेल्या प्रिन्सला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. हृदयाच्या ठोक्यांवर देखरेख करण्यासाठी ईसीजी यंत्रही त्याला लावले होते. या ईसीजी यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तारांनी पेट घेतला. त्यामुळे प्रिन्सच्या खाटेवरील चादरीलाही आग लागली. यामध्ये त्याच्या खांद्याला, कानाला आणि कमरेच्या भागाला भाजले. आग आटोक्यात आणून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button