breaking-newsपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी येथे आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते रिक्षाचालकांना अर्सेनिक अल्बम-30 औषधाचे वाटप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

चिखली- कुदळवाडी येथे  आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते २००रिक्षावाल्यांना जिवनावश्यक आणि गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

 “कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे  स्वीकृत सदस्य दिनेश यादव. आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   चिखली कुदळवाडी भागात दिनेश यादव यांनी या पूर्वी तयार जेवण अन्नधान्य सॅनिटायझर मास्क.गोळ्या आर्थिक मदत परप्रांतीयांना त्यांच्या घरापर्यंत स्व:ताच्या खर्चाने मनपा आणि पोलीस परवाना जाण्याची व्यवस्था केली. दिनेश यादव कार्यक्षम आमदार पै.महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. आज रविवार दिनांक २१ रोजी चिखली कुदळवाडी भागातील दोनशे रिक्षाचालकाना धान्यवाटप व होमिओपॅथी गोळ्याचे वाटप आमदार पै महेशदादा लांडगे व उपस्थित ग्रामस्थ मान्यवर च्या हस्ते वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या विषाणुमुळे सर्वच कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झालेले आहेत,यामधून रिक्षा चालक कुटूंब देखील सुटले नाहीत.रिक्षा चालकांना लॉकडाउन ची मोठी झळ सोसावी लागली आहे. त्यांच्या पुढे रोजगाराची मोठी समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे कुटूंबाचा उदारनिर्वाह कसा करायचा हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. हे पाहुन जमेल तशी मदत करण्याची भावना मनामध्ये ठेवून  प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडी मधीलदोनशे रिक्षा चालकांना धान्य व होमिओपॅथीक गोळ्याचे वाटपभोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते केले. यावेळी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदादिकारी बहुसंख्येने नागरीक व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आणि यामुळे रिक्षा चालाकामध्ये समाधानाचे वातावरण होते.

कोरोनाचा प्रसार अदयापही सुरूच असून, त्यामुळे जनजीवन संपुर्ण पणे विस्कळीत झाले आहे. त्यातच अजूनही लॉकडाऊन सुरुच आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता बाजारपेठा बंदच आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार देखील बंद आहेत. अशामुळे त्याच्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांचे हातवर पोट असल्यामुळे व कोरोना आणि लॉकाडाऊनमुळे प्रवाशी बाहेर पडण्याचे प्रमाण बंदच आहे.या पुढे ही विविध प्रकारची मदत करणार असल्याचे यादव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button