breaking-newsताज्या घडामोडीपुणे

किराणा दुकानदाराचे अपहरण, 1 लाखाची खंडणी मागणारा गजाआड

पुणे – किराणा दुकानदाराचे अपहरण करुन कोयत्याचा धाक दाखवून एक लाखाची खंडणी मारणाऱ्या व खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश दिलीप मोडक (वय 24, रा. वडकी गाव) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार रणजित पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आमराराम मुलाराम चांची (वय 26, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांची आणि गणेश मोडक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चांची हे 17 मे रोजी रात्री आठ वाजता किराणा दुकानात असताना मोडक व त्याचा मित्र रणजित पवार तेथे आले. त्यांना दुकानाबाहेर बोलावले व एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यासनकार दिला. तेव्हा गणेश मोडक याने त्यांच्या तोंडावर पाण्यासारखा पदार्थ टाकला. त्यांच्या गाडीतून कोयता काढून तो उलटा चांची यांना मारून जबरदस्तीने मोटारीत बसायला भाग पाडले.

मंतरवाडी फाटाजवळील पुलाकडून फुरसुंगीकडे जाणाऱ्या रोडवरुन त्यांना एका मोकळ्या जागेत नेले. तेथे मोडक याने त्यांच्या गळ्याला कोयता लावून दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. जर तू खंडणी नाही दिली तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.त्यानंतर ते दोघे पळून गेले. चांची यांनी इतर दुकानदारांशी चर्चा करुन त्यानंतर शनिवारी फिर्याद दिली. पोलिसांनी मोडक याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button