breaking-newsपुणेमहाराष्ट्र

किरकटवाडी चकाचक!

समाजमाध्यमांवरील मोहिमेला यश ; स्वच्छतेसाठी एकजूट

महापालिका हद्दीलगत असलेल्या किरकटवाडी गावात नागरिकांकडून उघडय़ावरच कचरा टाकण्यात येत असल्यामुळे या कचऱ्याच्या प्रश्नाला थेट समाजमाध्यमातूनच वाचा फोडण्यात आली. समाजमाध्यमातून कचरा उघडय़ावर टाकण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आल्यानंतर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत किरकटवाडी परिसर चकाचक करत एक नवा आदर्श घालून दिला.

महापालिका हद्दीलगत असलेला किरकटवाडी परिसराचा झपाटय़ाने विस्तार होतो आहे. अनेक गृहप्रकल्प येथे उभे राहिले आहेत. हा भाग अद्यापही ग्रामपंचायतीच्या अखत्यारित आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला कचऱ्याचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावत होता.

आसपासच्या गावातील नागरिकांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून आणि सिंहगडावर येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांकडून येथे थेट रस्त्यावरच कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

ग्रामपंचायतीकडून कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही मोठय़ा प्रमाणावर कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकण्यात येऊ नये, यासाठी किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने  सातत्याने आवाहन करण्यात येत होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमकडून ट्वीटरवर मोहीम चालविण्यात आली. कचरा रस्त्यावर टाकण्यात येऊ नये, असे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले.

या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिक, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, पोलीस यांनी एकत्र येत या भागाची स्वच्छता करून परिसर चकाचक केला. तत्पूर्वी देखील या परिसराची अनेक वेळा स्वच्छता करण्यात आली होती.

नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या वतीनेही या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सातत्याने कचरा रस्त्यावरच पडत होता, अशी माहिती किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य दत्ता रूपनवार आणि प्रकाश पवार यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडूनही दखल

ल्ल समाजमाध्यमातून आवाहन करण्यात आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्याची दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खुशाल करंजावणे, ग्रामपंचायत सदस्य सागर हगवणे आणि नरेंद्र हगवणे यांना त्यांनी दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. त्यानंतर स्वच्छता मोहिम झाली. पॅगो असोसिएशन आणि रिक्षा चालक संघटनांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. पॅगो संघटनेचे सोमनाथ शेलार, महेश कांबळे, आकाश शिंदे, दीपक कांबळे, हवेली पोलीस निरीक्षक शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम पार पडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button