breaking-newsपिंपरी / चिंचवड
कासारवाडीतील माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
महापालिका शिक्षण मंडाचे माजी उपसभापती आणि कासारवाडी येथील माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोपानराव लोंढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत कासारवाडी येथून 1992 ते 1997 या कालावधीत निवडून आले होते. तसेच 2002 ते 2007 या कालावधीत असे एकूण दहा वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. शिवाय महापालिका शिक्षण मंडळावर उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. त्यांचा अंत्यविधी आज, बुधवारी (दि. 20) दुपारी चार वाजता कासारवाडी येथे होणार आहे.