breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

काळवीट शिकार प्रकरण : सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रेला जोधपूर हायकोर्टाची नोटीस

राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. यातील प्रमुख आरोपी अभिनेता सलमान खान याला यापूर्वीच दोषी ठरवत सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो सध्या जामीनावर आहे.

ANI

@ANI

Black Buck Poaching case: Jodhpur High Court issues a notice to Saif Ali Khan, Sonali Bendre, Neelam Kothari, Tabu and Dushyant Singh on an appeal by state govt challenging their acquittal in the case by a local court.

५९ लोक याविषयी बोलत आहेत

१९९८मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थान गेले होते. दरम्यान, शुटींगचे काम संपल्यानंतर जवळच्या जंगलात भटकत असताना त्यांनी त्यांनी एका काळवीटाची शिकार केली होती. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button