breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कामावरुन काढल्याने कर्मचा-याचा कंपनीत गळफास घेवून आत्महत्या

पुणे – हिंजवडी येथील एमक्यूअर कंपनीच्या एका कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकल्याने त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुंदर गोरटे असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. सुंदर गोरटे यांनी काल 11 वाजून 59 मिनिटांनी फेसबूकवर याबाबत पोस्ट करत व्यथा मांडली होती.  “माझ्यावर दबाव आणून 23 आणि 24 तारखेला लिहून घेतले आणि मला एमक्युअर कंपनीतून काढले. मी त्यांना सांगितले होते की, मला कामावरुन काढलात तर मी जीव देईन. तरीही त्यांनी मला काढले. अशी पोस्ट गोरटे यांनी फेसबूकवर केली. तसेच या पोस्टच्या खाली त्यांनी अश्विनी मला माफ कर असेही लिहीले आहे.”

मात्र नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नक्की आत्महत्या केली का याबाबत संशय व्यक्त केली का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. गोरटे यांनी आत्महत्या केल्यानंतर हिंजवडी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button