breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामचुकार शिक्षकांच्या हातावर पक्षनेते एकनाथ पवार यांनी हानली ‘छडी’

  • महापालिका आयुक्तांनी दिली शिक्षेची तंबी
  • गुणवत्तेबाबत महापौरांनी व्यक्त केली चिंता

पिंपरी, (महाईन्यूज) – महापालिकेच्या शाळेतील सुविधा खासगी शाळांपेक्षा उत्तम आहेत. शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. खासगी शाळेच्या तुलनेत शिक्षकांना महापालिका चांगला पगार देते. खासगी शाळेत शिक्षक ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतात तसे कष्ट आपले शिक्षक का घेत नाही? असा प्रश्न सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्याध्यापकांना केला. चांगले काम करा, अन्यथा घरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशारा पवार यांनी शिक्षकांना दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्व मुख्याध्यापकांची बैठक आज चिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टरच्या सभागृहात घेण्यात आली. शिष्यवृत्तीमधील गुणवंत विद्यार्थी आणि उपक्रमशील शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शिष्यवृत्ती मिळवलेल्या 10 विद्यार्थ्यांसह 15 उपक्रमशील शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक मार्गदर्शन शिबिर, शाळा पाहणी दौरा अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या समजावून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या पटवाढीसाठी देखील विशेष प्रयत्न केले”.

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जास्तीचा वेळ द्या – आयुक्त हर्डीकर
महापालिका शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. शिक्षक शिकवताना कमी पडत असल्यास तुम्ही त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि शिक्षक ही सर्वस्वी मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. अप्रगत विद्यार्थ्यांकडे शाळेच्या वेळेच्या व्यतिरीक्त वेळ द्यायला हवा. आपल्या शाळा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. येत्या काळात प्रत्येक शाळेत ई- क्लासरुम होणार आहे. तर विविध सुविधा विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत. किमान संपादणूक विद्यार्थ्यांकडून करुन घेणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांकरिता उत्तेजन देणे तुमची जबाबदारी आहे. पुढच्या 15 दिवसांत शाळेतील अप्रगत विद्यार्थी निवडा, असे आदेश आयुक्तांनी मुख्याध्यापकांना दिले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button