breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगाराकडून मालकाला दीड लाखांचा गंडा, भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी – मालकाच्या परस्पर कामगाराने दुकानातून साहित्याची विक्री करून दीड लाखांचा अपहार केल्याप्रकरणी श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स दुकानाच्या सेल्समनविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

शाहबाज रशिद मुतवली (वय 25, रा. मातृछाया कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, मयुर पोपटलाल पगारिया (वय 39, रा. पार्श्वनाथ सोसायटी, नाशिक फाटा, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारिया यांचे भोसरी येथे श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स हे दुकान आहे. त्याला लागून मालाचे गोडाऊन देखील आहे. शाहबाज मुतवली हा दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. एप्रिल 2016 ते जुलै 2017 दरम्यान त्याने दुकानातील 1 लाख 50 हजार रुपयांचा माल मालकाच्या परस्पर विक्री केला. त्याचा कसलाही हिशोब न ठेवता फसवणूक केली. हा प्रकार कळताच मालक पगारिया यांनी तातडीने भोसरी पोलीस ठाण्यात शाहबाज याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button