breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने केली वादग्रस्त पोस्ट, प्रचंड हिंसाचारात २ जण ठार

बंगळुरू | कर्नाटकातील बंगळुरुत एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवरून संतप्त जमावाने काल (मंगळवार) रात्री कॉंग्रेस आमदाराच्या घरावरच हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक पोलीस जखमी झाले आहे. आमदाराच्या पुतण्याने एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने लोक संतप्त झाले आणि ही हिंसा भडकली असल्याचं समजते आहे. यावेळी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली.

आमदाराच्या पुतण्याने केलेल्या पोस्टप्रकरणी त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, अचानक उसळलेला हिंसाचार आणि जमावाने पोलिसांवर चढवलेला हल्ला लक्षात घेता आता बंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.बंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला तर एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या चकमकीत एसीपीसह सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू शहरातील कलम १४४ आणि डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस स्टेशन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

त्याच वेळी, बेंगळुरू येथील सहआयुक्त (गुन्हे) संदीप पाटील म्हणाले की, हिंसाचार प्रकरणात ३० जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जात आहे. अशीही त्यांनी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील पोस्टविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शेकडो लोकांनी आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घराला घेराव घालून थेट दगडफेक सुरू केली. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदाराच्या घराला आगही लावण्याचा प्रयत्न केला. तसेच घराला लावण्यात आलेली आग विझण्यासाठी आलेला अग्निशमन दलाच्या गाड्यांना देखील आंदोलकांनी पुढे येऊ दिलं नव्हतं. ज्यावेळी जमावाने घरावर हल्ला केला तेव्हा आमदार त्यांच्या घरात नव्हते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button