breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या – नगरसेविका आशा शेंडगे

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका शेंडगे यांनी या विभागाचे सहायक आयुक्त अजय चारठाणकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मदत दिली होती. त्यातच दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्या मूळ गावी गेले होते. त्यामुळे अनेकांना योजनांचे अर्ज भरता आले नाहीत. कोरोना काळात नागरिक निर्बंधात अडकल्यामुळे त्यांना पालिकेत येऊन अथवा नागरी सुविधा केंद्रात जाऊन अर्ज भरणे शक्य झाले नाही.

कोविड 19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. अनेकांच्या हाताला काम नव्हते. व्यवसाय ठप्प झाल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अनेकांना अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी अपुरा पडला. नागरवस्ती विकास योजना विभागाने नागरिकांच्या हिताचा विचार करून कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यास एक महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेविका शेंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button