breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर्मचा-यांना मारहाणीच्या घटना घडू नये म्हणून अध्यादेश काढा

– महापालिका कर्मचारी महासंघाचे आयुक्तांकडे मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअभियंता अनिल राऊत यांना शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी धक्काबुक्की व शिवागाळ केल्याने मुख्य प्रवेशव्दारावर त्या घटनेचा कर्मचा-यांनी आज (गुरुवारी) निषेध व्यक्त केला. तसेच याप्रकरणी चाैकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, कर्मचारी महासंघाने पुकारलेले लेखणी बंद आंदोलन आयुक्तांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
महापालिकेचे अधिका-याला मारहाण प्रकरणी कर्मचारी महासंघाने मुख्य प्रवेशव्दारासमोर द्वारसभेचे आयोजन केले होते. सदरील घटनेचा सर्व कर्मचा-यांनी निषेध व्यक्त करुन सदर प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी, यापुढे महापालिकेत असे प्रकरा घडू नये, तसे घडल्यास संबंधीत कर्मचा-याच्या वरिष्ठ अधिका-यांनी आयुक्तांना त्वरीत कळवुन त्या कर्मचा-यांसोबत जावुन एफ.आय.आर नोंदवावी, अशा प्रकारचे परिपत्रक निर्गत होईपर्यंत मनपातील मुख्य कार्यालयातील कर्मचा-यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचे जाहिर केले होते.
याबाबत आयुक्तासमवेत ऑटो क्लस्टर या ठिकाणी कर्मचारी महासंघ पदाधिका-यांची चर्चा झाली. सदरील चर्चेमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत परिपत्रक काढणेबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व सहाय्यक आयुक्त प्रशासन मंगेश चितळे अशा दोन अधि का-यांची समिती नेमली असून या घडलेल्या प्रकारची चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी कर्मचारी महासंघास शिष्टमंडळास दिले.  तसेच कर्मचारी महासंघाने सुरु केलेले लेखणी बंद आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती आयुक्त यांनी संघटनेला केल्यामुळे संघटनेने पुकारलेले लेखणी बंद आंदोलन सध्या स्थगित केले आहे.
सदर प्रकाराबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि असे प्रकार पुन्हा घडल्यास कर्मचा-यांच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कर्मचारी महासंघाच्या वतीने आयुक्त यांना देण्यात आला. यावेळी उपअभियंता अनिल राऊत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनीयर असोसिएशनचे पदाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, नितीन समगीर, अतुल आचार्य, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे, पांडुरंग मस्के, भगवान मोरे आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button