breaking-newsराष्ट्रिय

कर्नलची टोपी दिसताच चोराची देशभक्ती जागी; पण दारूच्या बाटलीसाठी लिहिला माफीनामा…

दिल्ली | महाईन्यूज

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या घरफोडयाच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाल्याने अखेर त्याने मोठया चोरीचा बेत रद्द केला. केरळच्या कोच्ची शहरातील तिरुवानकुलममध्ये ही अजब घटना घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून आत शिरल्यानंतर आपण निवृत्त कर्नलच्या घरात आलो आहोत, हे चोराच्या लक्षात आले. अचानक त्याच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाली. त्याने मोठया मुद्देमालाची चोरी न करता भिंतीवर बायबलमधील एक संदेश लिहिला व तिथून निघून गेला आहे.

घरातून बाहेर पडताना हा चोर फक्त १५०० रुपये, एक ड्रेस आणि लष्करी दारुची बाटली सोबत घेऊन गेला व भिंतीवर माफीनामा सुद्धा लिहिला. “टोपी पाहिल्यानंतर हे लष्करी अधिकाऱ्याचे घर असल्याचे माझ्या लक्षात आले. मला हे आधी माहित असते तर, मी इथे घरफोडी केली नसती. ऑफीसर मला माफ करा” असे भिंतीवरील संदेशात लिहिले होते तसेच बायबलमधील एक संदेशही लिहिला होता.कर्नल मागच्या दोन महिन्यांपासून कुटुंबासह बहरीन येथे गेला आहे. सकाळी नोकर झाडलोट करण्यासाठी घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे समोर आले. नोकराने लगेच पोलिसांना याची माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button