breaking-newsमहाराष्ट्र

कर्ज थकवल्यापोटी धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बॅंकेचा ताबा

परळीतून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेचा पराभव करुन निवडून आलेले आणि आता विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एक खळबळजनक वृत्त आहे. पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. मात्र, हा राजकीय कट असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना केला आहे.

पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिल भोसले यांच्या नियंत्रणाखाली होती. मे महिन्यांत आरबीआयने एनपीए फुगल्यामुळे या बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. ऑक्टोबर महिन्यांत या बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले असून त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, “गेल्या महिन्यांत आपल्याला कर्जफेड न झाल्याने बँकेची नोटीस आली होती. त्यावेळी मी बँकेच्या प्रशासनाला विनंती केली होती की, मी सध्या निवडणुकीच्या कामामध्ये अंत्यत व्यस्त असल्याने ३० ऑक्टोबरनंतर हे कर्ज चुकते करेन. मात्र, माझ्या विनंतीनंतरही बँकेने पुढे जात माझा फ्लॅट ताब्यात घेतला. मी कर्जाची काही रक्कम देऊ केली आहे. मात्र, मधल्या काळात काही आर्थिक अडचणी आल्याने मी उर्वरीत रक्कम भरू शकलो नाही,” असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button