breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘कमी- जास्त, जे काही,या लढ्यात माझाही खारीचा वाटा’, CM relief fund ला सोनाली कुलकर्णीची मदत

कोरोना विषाणूविरोधात लढाईसाठी राज्य सरकारला मदत व्हावी यासाठी अनेकजण त्यांच्या परिने शक्य होईल तितकी मदत ते करत आहेत…त्यात आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. ‘कमी- जास्त, जे काही असेल, या लढ्यात माझा खारीचा वाटा आहे. गरजूंपर्यंत ही मदत पोहचावी आणि त्याचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा’ असं लिहित सोनालीनं इतरांना देखील मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

सोनालीनं मात्र मदत निधीची रक्कम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. निधीच्या रकमेवर माध्यमांमध्ये चर्चा होवू नये म्हणून रक्कम सांगत नाही असं सोनाली यावेळी म्हणाली. ‘मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे, माणसं आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे, असं म्हणत तिनं या लढ्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button