breaking-newsराष्ट्रिय

कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष  कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुरूवारी रात्री उशीरा काँग्रेसने ट्विटरद्वारे कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. शनिवारी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Congress

@INCIndia

Our best wishes to Shri @OfficeOfKNath for being elected CM of Madhya Pradesh. An era of change is upon MP with him at the helm.

3,970 people are talking about this

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसेल असंही सांगितलं जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.  मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस होती, मात्र पहिल्यापासूनच कमलनाथ यांचं नाव आघाडीवर होतं. पण नेतृत्वाचा प्रश्न राज्यात सुटू न शकल्याने अंतिम निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला होता. त्यानुसार आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना अखेर माघार घ्यावी लागली. त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं समजतंय.

‘ना कुठली स्पर्धा आहे ना पदासाठीचा संघर्ष. आम्ही मध्य प्रदेशाच्या जनतेच्या सेवेसाठी आहोत,’ असे ट्विट करून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वखुशीने माघार स्वीकारली. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांना एकत्रित घेऊन काढलेले छायाचित्र ट्विट केले आणि समन्वयाने निर्णय झाल्याचे संकेत दिले. गुरुवारी रात्री साडेआठनंतर मध्य प्रदेशचे हे नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील तुघलक रोडवरील निवास्थानातून बाहेर पडले आणि खास विमानाने भोपाळला रवाना झाले. त्यानंतर रात्री उशीरा काँग्रेसच्या भोपाळ येथील मुख्यालयात काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि कमलनाथ यांच्या  नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी संसदेत पत्रकारांनी सांगितले होते. त्यामुळे दिवसअखेर अंतिम निर्णयाची अपेक्षा होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाठवलेल्या काँग्रेस निरीक्षकांनी पक्षाध्यक्षांकडे अहवाल दिला होता. मध्य प्रदेशमध्ये आमदारांचा कल कमलनाथ यांच्याकडे अधिक असल्याचे संकेत मिळले होते. त्यामुळे कमलनाथ हेच मुख्यमंत्री असतील, असे सांगितले जात होते. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांनी स्वतंत्रपणे राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मात्र निर्णयातील गुंतागुंत वाढत गेल्याचे दिसले. त्यामुळे ‘मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत राहुलला विचारा,’ अशी प्रतिक्रिया देणाऱ्या यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनादेखील राहुल यांनी निवासस्थानी बोलावून घेतले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही बैठकीत सहभागी झाल्या. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत गांधी परिवारातही सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कमलनाथ यांची नियुक्ती करण्यावर सहमती झाल्याचे समजते. मात्र, दिल्लीत कमलनाथ यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली गेली नाही. दोन्ही नेत्यांना भोपाळमध्ये परतण्यास सांगण्यात आले.  त्यानंतर आज रात्री उशीरा काँग्रेसच्या भोपाळ येथील मुख्यालयात काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि कमलनाथ यांच्या  नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बोलताना कमलनाथ यांनी सर्वप्रथम समर्थन दिल्याबद्दल ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले. मध्य प्रदेशमध्ये आम्ही एक नवी सुरूवात करु, आम्ही निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये जनतेला जी आश्वासनं दिली ती सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करु.  शुक्रवारी (दि.14) सकाळी साडेदहाच्या सुमारास राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली.

टॉलस्टॉयचा दाखला!
राहुल गांधी यांनी अभिनव पद्धतीने कमलनाथ यांच्या निवडीचे प्रथम संकेत दिले. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य या दोघांसोबत हसऱ्या मुद्रेतले छायाचित्र ट्विट केले आणि त्याखाली ‘‘उभय योद्धय़ांकडे संयम आणि वेळ दोन्ही आहे!’’ हे लिओ टॉलस्टॉय यांचे वचनही उद्धृत केले. ज्योतिरादित्य यांनीही हेच छायाचित्र ट्विट केले आणि त्याखाली लिहिले की, ‘‘मुख्यमंत्रीपदासाठी कोणतीही स्पर्धा नाही. लोकांची सेवा करण्याला सर्वोच्च महत्त्व आहे.’’

Rahul Gandhi

@RahulGandhi

The two most powerful warriors are patience and time.

– Leo Tolstoy

17.6K people are talking about this

ANI

@ANI

Kamal Nath to be the Chief Minister of Madhya Pradesh. There will not be a Deputy Chief Minister in MP.

298 people are talking about this

मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री कोण?, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून कळीचा ठरला होता. अखेर मध्य प्रदेशची धुरा कमलनाथ यांच्याकडे असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button