कपिल शर्मा शो ची 125 दिवसांनी शूटिंग सुरु
मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे गेले काही महिने सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग बंद होती. आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर हळूहळू सर्व टीव्ही कार्यक्रमाची शूटिंग सुरु करण्यात आली आहे. काही कार्यक्रमाचे नवीन एपिसोडही टेलीकास्ट केले आहेत. आता ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंगही सुरु होत आहे. कपिल शर्मा आणि भारती सिंहने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्या व्हिडीओमध्ये भारती सिंह आणि सुमोना चक्रवर्ती सॅनिटायझर लावत असल्याचे दिसत आहेत.
कपिल शर्मा शो ची शूटिंग सुरु
125 दिवसांनी ‘द कपिल शर्मा शो’ ची शूटिंग सुरु होत आहे. सोशल मीडियावर जे व्हिडीओ शेअर झाले आहेत. त्यामध्ये सुमोना आणि भारती सॅनिटायझर लावत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण आता लवकरच चाहत्यांना कपिल शर्मा शो चा नवीन एपिसोड पाहता येणार आहे. चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा कार्यक्रम बंद झाला होता तेव्हा अनेक चाहते कपिलची आठवण काढत होते.