breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा निविदा पुन्हा वादात ; नियमांचे उल्लंघन, अवलोकन विषयाला उपसुचना देवून मंजूरी

कच-यांचा विषय परत विषय पत्रिकेवर आणा – विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  घरोघरचा कचरा गोळा करणे आणि वाहतूक करण्याचा विषयावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत वाद उफाळून येणार असल्याचे दिसू लागले आहे. सत्ताधारी भाजपने महासभेत विषय क्र 19 हा अवलोकनाचा आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्टया त्या विषयाला उपसुचना देता येत नाही. परंतू, कच-याच्या  570 कोटीच्या कामास उपसूचनेद्वारे न वाचताच प्रशासकीय मान्यता घेतली. तसेच घाईगडबडीत अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देऊन मंजूर करुन घेतला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने नियमांचे उल्लंघन करत विषय मंजूर केला आहे, असा आरोप आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला असून त्या विषयाला प्रशासकीय मान्यतेसाठी पुन्हा विषयपत्रिकेवर आणण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली आहे. 

कचरा गोळा करणे, वाहतूक करणे या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अ -फ, ब-ड, क-ई, ग-ह अशा नव्याने 4 निविदा प्रसिध्द करुन आठ वर्षाचा कार्यकाल निश्चित केला आहे. त्यासाठी येणा-या 570 कोटीला गुरुवारी (दि.27) महासभेत उपसूचनेद्वारे एेनवेळी प्रशासकीय मान्यता दिली. याबाबत विरोधी पक्षनेते साने म्हणाले की, भाजप पदाधिका-यांनी न वाचताच अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देऊन कचरा संकलनाच्या 570 कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता घेतली आहे. चार ते पाच नगरसेवकांनी उपसूचना मंजूर करुन घेतली आहे.

कच-याचा संवेदनशील व गंभीर विषय आहे. यावर साधक बाधक चर्चा होण्याची आवश्यकता आहे,  570 कोटीचा प्रशासकीय मान्यतेचा विषय प्रशासनाकडून येणे अपेक्षित होते. तो घाई घाईने मंजूर केला आहे. या विषयाची उपसूचना वाचली गेली नाही. त्यामुळे ही उपसूचना नेमकी काय होती याचा उलगडा झाला नाही.  या उपसूचनेची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. रितसरपणे आवश्यक तेवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता घेण्याचा विषय रितसर कार्यपत्रिकेवर प्रशासनामार्फत फेरसादर करण्यात यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साने यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button