breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

ओळखपत्रातील चेहरा आणि तुमचा चेहरा जुळला नाही तर, परिक्षाही नाही…

परीक्षेपूर्वी तुमचे ओळखपत्र आणि परीक्षेपूर्वी वेबकॅमद्वारे दिसणारा चेहरा यात जर तफावत आढळली तर अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षेच्या वेळ अडचण येऊ शकते…फोटोजेनिक दिसण्यासाठी तुम्ही बॉयकट, हेअर कलर असे अनेक स्टायलिश लूक देऊन फोटो काढत असाल तर सावधान! अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा देताना कदाचित तुमचा हा स्टायलिश लूक तुम्हाला अडचणीत आणू शकतो. कारण परीक्षेपूर्वी तुमचे ओळखपत्र आणि परीक्षेपूर्वी वेबकॅमद्वारे दिसणारा चेहरा यात जर तफावत आढळली तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्या संदर्भात कठोर नियम आणले आहेत.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना वेबकॅम, इंटरनेट, स्क्रीनचा आकार, रॅम या संदर्भातील अटी घातल्यानंतर विद्यापीठाने पारदर्शकतेसाठी अधिक कठोर नियमांचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याचे ओळखपत्र आणि परीक्षेपूर्वी वेबकॅमद्वारे विद्यार्थ्याचा ‘चेहरा’ तंतोतंत जुळणे अत्यावश्यक असून, चेहरा जुळण्यास अडचणी आल्यास परीक्षा देता येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकिटावरच परीक्षेसाठीचे यूजर नेम व पासवर्ड राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची चेहरा पडताळणी केली जाईल. हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा कॉलेजचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अपलोड करायचे आहे. या फोटोची साइज ‘शंभर केबी’ इतकीच असावी. विद्यापीठाने परीक्षेसाठी तयार केलेली ई-प्रणाली दोन्ही चेहरे तपासेल. त्यामुळे ओळखपत्र जोडतानाच विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. स्पष्ट चेहरा दिसेल अशा स्वरूपात परीक्षेला बसावे, यासह विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ संपण्यापूर्वीच सबमिट बटणावर क्लिक करणे अनिवार्य आहे. एकदा सबमिट झालेला पेपर पुन्हा देता येणार नाही, या नवीन नियमांची भर विद्यापीठाने घातली आहे.

ऑनलाइन परीक्षा सुरू असताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. परीक्षेदरम्यान तांत्रिक खंड पडल्यास विद्यार्थ्यांना तेवढाच वेळ पुढे वाढवून दिला जाईल. विद्यापीठाच्या प्रणालीत तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण साठ मिनिटांचा अवधी परीक्षेसाठी मिळणार आहे.

अनेकदा सोपे प्रश्न सोडविण्यास विद्यार्थी प्राधान्य देतात. हीच सोय ऑनलाइन परीक्षेतही उपलब्ध आहे. लॉगिन केल्यावर विद्यार्थ्यांना स्क्रीनवर बुकमार्कचा पर्याय दिसेल. त्यातून अपेक्षित प्रश्न क्रमांक निवडून उत्तर नोंदवता येईल. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर नंतर देणेही शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सुचना

-परीक्षेवेळी वेबकॅमद्वारे फोटो काढले जातील.

-विद्यार्थ्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आल्यास ताकीद देण्यात येईल.

-विद्यार्थ्याला परीक्षा देताना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येणार नाही.

-कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करणे, अन्यथा आजूबाजूने एखादी व्यक्ती जाणे गैर असेल.

-नियमांचे पालन न झाल्यास विद्यार्थ्याची परीक्षा त्वरित स्थगित होईल.

उपलब्ध गॅजेट्सद्वारेच विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा

फोटोवरून विद्यार्थ्यांचे विचारण्यात येणारे काही प्रश्न

  • जवळच्या व्यक्तीच्या दशक्रियेमुळे विद्यार्थ्याने टक्कल केली असल्यास आणि ओळखपत्रावरील केसांची पूर्ण वाढ झालेला फोटो मॅच न झाल्यास काय?
  • असे कुणाच्याही बाबतीत होऊ नये, पण अपघाताने डोक्याला, कपाळाला जखम झाल्यास बँडेज लावून एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागली आणि तो चेहरा ओळखपत्रातील फोटोशी जुळला नाही तर काय?

अंतिम वर्ष परीक्षांसाठी राज्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  • एखाद्याला जवळचे स्पष्ट दिसत नाही म्हणून त्याला चष्मा लावूनच पेपर द्यावा लागेल, पण फोटोत नंबरचा चष्म्याशिवाय फोटो असेल तर तो चेहरा मॅच न झाल्यास काय?
  • दाढीमिशी नसलेला फोटो आणि परीक्षेवेळी विद्यार्थ्याला दाढीमिशी वाढलेली असेल तर अशा वेळी काय?
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button