breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ओबीसी आरक्षण बचावसाठी पुण्यात पोतराज वेश परिधान करुन आंदोलन

पुणे – ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विविध संघटनांनी संविधानिक न्याय मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पोतराज आंदोलन करण्यात आले.

ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. उद्भवलेल्या परिस्थितीचा ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रीयेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. समाजाने राज्यात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन सुरू केलेले आहे. 

ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरूच राहणार असून याच आंदोलनाचा भाग म्हणून आज पोतराज आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झालेल्या या आंदोलनात प्रा लक्ष्मण हाके हे पोतराज वेषात निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी बाळासाहेब सानप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button