breaking-newsआंतरराष्टीय
ऑस्ट्रेलियाने आपला राष्ट्रध्वज बदलाव: न्यूझीलंडचे आवाहन
वेलिंग्टन: ऑस्ट्रेलियाने आपला राष्ट्रध्वज बदलावा असे न्यूझीलंडने आवाहन केले आहे, दोन्ही देशांच्या राष्ट्रधवजांच्या सारखेपणामुळे गोंधळ होतो असे न्यूझीलंडचे प्रभारी पंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी म्हटले आहे. या ध्वजाचे डिझाईन आम्ही तयार केले आणि आम्ही तो वापरता आहोत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या राष्ट्रध्वजातीला सारखेपणामुळे जगभरातील लोकांचा गोंधळ होतो. तुर्की आणि अन्य काही ठिकाणी मी स्वत: हा अनुभव घेतलेला आहे, असे पीटर्स यांनी सांगितले.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज गडद निळ्या रंगाचे आहेत. त्यांच्या वरच्या कोपऱ्यात युनियन जॅक आहे. फरक त्यावर असणाऱ्या ताऱ्यांच्या संख्येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ध्वजावर सहा सफेद आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रद्वजावर लार रंगाचे चार तारे आहेत. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा सध्या मातृत्व रजेवर असून पीटर्स हे कार्यवाहू पंतप्रधान म्हणून काम करत आहेत.