breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एसबीआय’चे ५ कर्मचारी कोरोनाबाधित, परळीसह १६ गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर

बीड | महाईन्यूज

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. त्यामुळे आजपासून परळी शहर आणि परिसरातील १६ गावांमध्ये ८ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

बँकेच्या या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात अनेक गावांतील नागरिक आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने येथे लॉकडाऊन केला आहे. हा लॉकडाऊन १२ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

परळी शहरातील शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियातील पाच कर्मचारी काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. परळी शहर आणि परिसरातील जवळपास १६ गावांतील नागरिक त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शहर आणि परिसरातील गावांमध्ये आजपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.

८ दिवसांचा हा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा आणि दुध, मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. ग्रामीण भागात मात्र शेती आणि शेतीविषय कामाची दुकानेही या लॉकडाऊनमध्ये सुरू राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button