breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर, पिंपरी चिंचवड शहराचा 86.46 टक्के निकाल

  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्क्यांनी शहराचा निकाल घसरला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवारी (ता. 8) जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 86.49 टक्के लागला आहे. गतवर्षी 94.33 टक्के निकाल लागला होता. त्या तुलनेत यंदाचा निकाल आठ टक्‍क्‍यांनी घटला आहे.

परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 187 विद्यालयांमधून 19 हजार 171 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 50 विद्यार्थ्यांनी 36 केंद्रांतून परीक्षा दिली होती. त्यापैकी प्रथमच परीक्षेला बसलेले 16 हजार 477 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 10 हजार 186 मुले व 8 हजार 864 मुली परीक्षार्थी होते. यात 8 हजार 416 मुले (82.62 टक्के) आणि 8 हजार 61 मुली (90.94 टक्के) उत्तीर्ण झाल्याने मुलींचा टक्का वाढला आहे.

दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना सकाळपासूनच उत्सुकता होती. काहींनी सायबर कॅफेमध्ये जाऊन, तर काहींनी आपल्या स्मार्ट फोनवर निकाल पाहण्यास पसंती दिली. शहरातील 187 शाळांपैकी 45 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात महापालिकेच्या एकाही शाळेचा समावेश नाही. यंदा शहरातून दोन हजार 573 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

शंभर टक्के गुण मिळवणा-या 45 शाळा

1) सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी
2) डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी
3) इंदिरा गांधी हायस्कूल, पिंपरी
4) कमलनयन बजाज स्कूल, चिंचवड
5) विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी
6) क्रिस्ट्रिया स्कूल, प्राधिकरण-निगडी
7) श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड
8) प्रेरणा माध्यमिक विद्यालय, प्राधिकरण-निगडी
9) श्रीमती जयसिंग हुजा गुरुनानक हायस्कूल, सांगवी
10) ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल, नेहरूनगर-पिंपरी
11) डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, पिंपरी
12) मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर-निगडी
13) निर्मल बेथनी हायस्कूल, काळेवाडी
14) ट्रिनिटी इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी
15) मारईवानियस कॉन्व्हेन्ट स्कूल, काळेवाडी
16) संत साई हायस्कूल, आदिनाथनगर-भोसरी
17 ) सेंट ऍन्स स्कूल, त्रिवेणीनगर
18) लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, थेरगाव
19) सुबोध माध्यमिक विद्यालय, संभाजीनगर
20) भिकोबा तांबे मेमोरिअल हायस्कूल, रहाटणी
21) श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, लांडेवाडी
22) अमृता विद्यालयम, यमुनानगर-निगडी
23) श्रमजीवी माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर-भोसरी
24) प्रियदर्शिनी हायस्कूल, इंद्रायणीनगर-भोसरी
25) सी. एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, निगडी
26) मास्टर माईंड इंग्लिश मीडियम, कृष्णानगर-नवी सांगवी
27) शेठ आर. आर. आगरवाल माध्यमिक विद्यालय, भोसरी
28) इनफंट जिझस हायस्कूल, वेणूनगर-वाकड
29) लक्ष्मीबाई नांदगुडे स्कूल, पिंपळे निलख
30) एस. एन. बी. पी. हायस्कूल, मोरवाडी
31) चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी
32) अल्मारनर हायस्कूल, कुदळवाडी-चिखली
33) द न्यू मिलेनियम स्कूल, नवी सांगवी
34) गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम, चिंचवड
35) होली इंग्लिश मीडियम, रहाटणी
36) गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, गणेशनगर-दापोडी
37) प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी
38) डी. आय. सी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पेठ क्रमांक 28-निगडी
39) विद्यार्थी विचार प्रशाला, चिखली
40) पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी
41) न्यू इंग्लिश स्कूल, चिंचवड
42) मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवड
43) युनिक व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवड
44) श्री नारायण गुरू इंग्लिश मीडियम विद्यालय, चिंचवड
45) सेंट पॉल इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button