breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयएमच्या अकबरुद्दीन आेवैसीपुढे शिवसेना,भाजपा-काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

हैदराबाद – एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजपा अन् शिवसेना नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवैसी यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ओवैसी यांच्याविरोधात लढणाऱ्या शिवसेना उमेदवाराला केवळ 112 मतं मिळाली आहेत. त्यामुळे औवेसींविरुद्ध लढणाऱ्या सर्वच 14 विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत अकबरुद्दीने ओवैसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवैसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. त्यामुळे एमआयएमच्या निवडणुकीतील कामगिरीबद्दल उत्सुकता होती. त्यामध्ये केवळ भाषणबाजीतूनच नाही तर, मतदारांना आपल्याकडे खेचण्यातही अकबरुद्दीन यांना यश मिळाले आहे. अकबरुद्दीन यांना 64,853 मतं मिळाली असून त्यांच्याविरोधातील काँग्रेस उमेदवाराला 7475 मतं मिळाली आहेत. तर, भाजपा उमेदवाराला 8137 मते घेण्यात यश आले. तसेच राज्यात सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला येथील जागा खेचून आणण्यात अपयश आले आहे. कारण, टीआरएसच्या उमेदवाराला येथे 7658 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ओवेसींपुढे काँग्रेस, भाजपा, टीआरएससह शिवसेना आणि इतर सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या निवडणुकीत नोटाला 569 मतं मिळाली आहेत.

विजयी उमेदवारास मिळालेल्या मतदानाच्या 1/3 (एक तृतिअंश) मतदान मिळवणे विरोधी उमेदवारास आवश्यक आहे. अन्यथा, त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार चारही दिग्गज पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना उमेदवार सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघात उमेदवार देत आपले हसू करुन घेतले, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, ओवैसींविरुद्ध अक्कीनामोनी व्यंकटेश या अपक्ष उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे 60 मतं मिळाली आहेत. दरम्यान, ही आकडेवारी दुपारी 12.46 पर्यंतची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button