breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

एफसी पुणे सिटीकडून रोहित कुमारच्या करारात दोन वर्षे वाढ

पुणे: राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाचा अव्वल मध्यरक्षक रोहित कुमार याच्या करारात दोन वर्षांची वाढ केल्याची घोषणा आज केली. 31 वर्षीय रोहितहा सर्वप्रथम 2017 मध्ये एफसी पुणे सिटी संघात दाखल होता आणि तो आता 2018-19 व 2019-20ही दोन वर्षे एफसी पुणे सिटीकडून खेळणार आहे.
एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, गेल्या मौसमात आम्ही संघात सामील करून घेतलेल्या युवा खेळाडूंमध्ये रोहितची कामगिरी सर्वोत्तम होती. आम्ही त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. तसेच, डीएसके शिवाजीयन्स संघातील त्याची कामगिरीही आम्ही बारकाईने अभ्यासली होती. त्याची कार्यपध्दती आणि खडतर कष्ट घेण्याची वृत्ती अतिशय अपवादात्मक अशीच आहे. तो मैदानावर आणि मैदानाबाहेरही अतिशय शिस्तबध्द आणि कठोर परिश्रम घेणारा खेळाडू आहे. त्याची मैदानावरील सहकाऱ्यांना सांभाळून घेण्याची पध्दत आणि सावधपणा यामुळे संघाला अनेकदा उत्कृष्ट प्रकारे आक्रमण करणे शक्‍य होत असते. त्याने एफसी पुणे सिटी संघासोबत आणखी दोन वर्षे राहण्याचा निर्णय घेतला आहे, याचा आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.
मुळ दिल्लीचा असलेल्या रोहित कुमारने तीन वर्षे डीएसके शिवाजीयन्स संघासोबत खेळल्यानंतर एफसी पुणे सिटी संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या मौसमात रोहितने 14 सामन्यांत सहभाग घेतला असून त्यामध्ये दोन गोल नोंदविले. दोन्ही गोल हे त्याने एटीके संघाविरूध्द केले होते. तसेच, एटीकेच्या मैदानावरील सामन्यांतील त्याच्या गोलची मुख्य प्रशिक्षकांकडून सामन्याचा टर्निंग पॉईंट अशी प्रशंसा करण्यात आली होती.
एफसी पुणे सिटी संघाचा करार वाढविण्याबाबत रोहित कुमार म्हणाला की, माझ्यासारख्या युवा खेळाडूंना अशा संघाकडून खेळण्याची संधी मिळणे, ही अतिशय महत्वाची बाब आहे. एफसी पुणे सिटी संघाने मला ही संधी दिली. इतकेच नव्हे गेला संपूर्ण मौसम माझ्यासाठी चांगला गेला. आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीत मला मोलाचा वाटा उचलता आला. माझ्या मते एफसी पुणे सिटी हा सध्या भारतात सर्वाधिक प्रगती करणारा संघ आहे. माझ्यासारख्या युवा खेळाडूंसाठी हा संघ अतिशय योग्य आहे. आगामी मौसम संघासाठी अधिक संस्मरणीय ठरेल, याकरिता सर्वस्व पणाला लावेन.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button