मनोरंजन

‘उरी’नंतर आणखी एका देशभक्तीपर चित्रपटात विकीची ‘एंट्री’

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून विकीच्या कारकिर्दीमधील हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. विशेष म्हणजे विकी लवकरच चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आगामी उधम सिंह या चित्रपटात झळकणार आहे.

उधम सिंह हा चित्रपट शहीद स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि शूजित पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

विकीच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला तर आपल्या लक्षात येतं की विकी कायम नवीन धाटणीच्या चित्रपटांची निवड करतो. त्याच्या अनेक चित्रपटांकडे पाहता तो कायम आव्हानात्मक भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या आगामी चित्रपटासाठी मला अशाच अभिनेत्याची गरज होती, असं शूजित सरकार यांनी सांगितलं.

तर या चित्रपटाविषयी विकीने देखील त्याचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. मला कायमच शूजित यांच्यासोबत काम करायचं होतं. अखेर ती संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे, असं विकीने सांगितलं.

दरम्यान, उधम सिंहमध्ये विकीपूर्वी इरफान खान झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे इरफाननेच या चित्रपटासाठी नकार दिला. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूरदेखील या चित्रपटामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या उधम यांनी त्यावेळी मायकल अॅडवायरची हत्या केली होती. १९१९ साली जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश त्यावेळी मायकल अॅडवायरने दिले होते. ही भारतीय इतिहासातील एक वाईट घटना होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button