breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षय कुमारची आई अत्यवस्थ; हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्येत खूपच गंभीर असून त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईची प्रकृती खूपच गंभीर असल्याची बातमी समजल्यानंतर अक्षय कुमार लगेचच लंडनहून मुंबईत दाखल झाला आहे.

अक्षय कुमार त्याच्या सिंड्रेला या चित्रपटाच्या चित्रीकरणाकरिता लंडनला होता. आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून मुंबईत दाखल झाला आहे. अक्षय आणि त्याच्या आईमध्ये खास नाते आहे. यामुळेच आईच्या आजारपणाची बातमी मिळाल्यानंतर तो लगेचच मुंबईला आला आहे. दरम्यान, त्याने निर्मात्यांना ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही. ती दृश्ये चित्रीत करावी असे सांगितले आहे. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षाअगोदर त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. अरुणा भाटिया यादेखील चित्रपट निर्मात्या होत्या. त्यांनी हॉलिडे, नाम सबनम आणि रुस्त या चित्रपटांची निर्मिती केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button