breaking-newsपिंपरी / चिंचवड

उपेक्षितांसाठी सत्कर्म सोशल फाऊंडेशनचे कार्य उल्लेखनिय – पूजा लांडगे

पिंपरी, (महाईन्यूज) – समाजातील उपेक्षित घटकासाठी सत्कर्म सोशल फाउंडेशनने केलेले काम उल्लेखनीय आहे. समाजातील इतर घटकांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पुजा महेश लांडगे यांनी केले.

आज पताशीबाई लुंकड अंधशाळेत वाढदिवसानिमित्त अंधमुलांना अन्नदान करून सत्कर्म सोशल फाउंडेशनचे सदस्य निरज राजू लांडे व अथर्व जायभाय यांनी अनोखा वाढदिवस साजरा केला. समाजातील अनाथ व दिव्यांग व्यक्तींसाठी काम करण्याच्या हेतूने दरवर्षी असा वाढदिवस साजरा करतो, असे निरज लांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पुजा महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गणेश जवळकर, संगीता लांडे, सोनाली लांडे , निकिता लांडे, प्रतिक लांडे, अंकिता लांडगे, सिद्धांत गोडसे, तुषार लांडगे, रोहित लोंढे, रोहन घावटे, आदित्य शिंदे, अभिषेक पासलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button