breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमहापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून या नगरसेवकांना उमेदवारी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. तर, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला आहे. 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यात घोळवे यांच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे.

माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी जोरदार फिल्डींग लावली होती. लांडगे समर्थक नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव पुढे आले होते. तर, जगताप समर्थक नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नावाची चर्चा होती.

अखेर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही आमदार समर्थकांच्या चढाओढीला ब्रेक लागून नगरसेवक केशव घोळवे यांचे नाव पुढे आले. आज त्यांनी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेविका निकिता कदम यांनी अर्ज भरला. 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

केशव घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून ते 2017 च्या  निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर समजले जाणारे नारायण बहिरवाडे यांचा त्यांनी पराभव केला. अ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button