breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत गादी कारखान्याला आग; दिवाळीसाठी भरलेला माल जळाला

पिंपरी |महाईन्यूज|

दापोडी येथील बुद्धविहार परिसरासमोर सोमवारी (दि. 2) दुपारी श्री गणेश गादी कारखान्याला आग लागली. त्यात दुकानातील मशिनरी, कापड आणि कापूस याचे नुकसान झाले.

दुकानमालक नानासाहेब जाधव म्हणाले, “शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दिवाळी सणामुळे नुकताच नवीन माल भरला होता. मशिनरी, मोटार, वायरिंग कापड, असे एकूण दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले.” स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्‍यात आणली.

स्थानिक रहिवासी अतुल काटे, इक्‍बाल फरीद खान, संजय पात्रे, राजेंद्र काटे, मुस्ताक मन्सुरी, मधुकर चौधरी, दीपक पवार यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, मोठे नुकसान झाल्याचे दुकानमालक जाधव यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button