breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
मुंबई – कोरोना संसर्ग रोगाची मंदावलेली गती लक्षात घेता, उद्यापासून विधीमंडळाचे मुंबईत हिवाळी अधिवेश सुरु होणार आहे. हे अधिवेशन 14-15 डिसेंबर या कालावधीत घेतले जाणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला दोनच दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
वाचा :-सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार असून, त्याचबरोबर दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपवले जाणार आहे.दरम्यान, या अधिवेशनात महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे.