breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उदयनराजेंच्या मागणीला यश, साताऱ्यातील शिवस्मारकासाठी अडीच कोटी मंजूर

मुंबई : सातारा येथील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी व ऐतिहसिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी नियोजन मंडळातून अडीच कोटींचा निधी आवश्यक आहेत. हा निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्य केले आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून तातडीने मदत करण्यात यावी, याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी उदयनराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

वाचाः पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

सातारा शहराला व जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अनेकांना प्रेरणा देत असतात. काही ऐतिहासिक वास्तू काळाबरोबर नामशेष झाल्या तर काही वास्तु आजही अस्तित्वात आहेत. या वास्तूंचे जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा पुतळा पोवईनाका येथे आहे. या परिसराचे सुशोभीकरण आणि चबुतऱ्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button