breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात ४०० जणांना नोटीस, ११०० जणांना अटक

बिजनौर | नागरिकत्व दुरुस्ती कायदावरून पेटलेल्या उ. प्रदेशात राज्य पोलिसांनी सुमारे ४०० जणांना सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली असून या व्यक्तींकडून नुकसान भरपाई घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी १,१०० जणांनाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पाठवलेल्या सर्वाधिक नोटीसा मुराबादाबाद येथे २०० जणांना असून लखनौत १००, गोरखपूरमध्ये ३४ तर फिरोजाबादमध्ये २९ जणांना पाठवण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी दंगल भडकवणाऱ्या काही समाजकंटकांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून फरार असलेल्या समाजकंटकांची माहिती देण्याऱ्यास इनाम देण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी मऊमध्ये ११०, कानपूरमध्ये ४८, फिरोजाबादमध्ये ८० समाजकंटकांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button