breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात साकारणार देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी, मुख्यमंत्री योगींची घोषणा

लखनऊ – देशभरात सर्वात मोठा हिंदी फिल्मोद्योग म्हणून मुंबईचे नाव प्रसिद्ध आहे. परंतु आता उत्तरप्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. ही फिल्म सिटी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात येणार आहे.

लखनऊमध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सध्याच्या स्थितीत देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची आवश्यकता असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार असून त्यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र अधिक चांगले असल्याचेही ते म्हणाले.

या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसंच रोजगाराच्या दृष्टीनेही अत्यंत उपयोगी प्रयत्य ठरेल. यासाठी त्यांनी जागेसाठी पर्याय उपलब्ध करुन लवकरात लवकर कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय योगींनी मेरठ आणि गाझियाबाद ही दोन शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याची महत्त्वाची योजना असल्याचे सांगत, त्यासाठीचे काम लवकर सुरु करण्याचेही या बैठकीत सांगतिले. तसंच दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी, हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button