breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

साकीनाका बलात्कार प्रकरणावर महापौर पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई | 

मुंबईतल्या साकीनाका भागात घडलेला अमानवी बलात्काराचा प्रकार समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही भीषण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या बलात्कार पीडितेची भेट घेतली असून तिच्या परिस्थितीविषयी माहिती दिली आहे.

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महापौर पेडणेकर यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “या पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला असून तिच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाली आहे. तिची आतडीही बाहेर आलेली होती आणि जंतूसंसर्गही मोठ्या प्रमाणावर झाला होता. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असून ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. ती प्रचंड वेदनेत असून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत”.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज सापडलं असून त्यात आरोपी दिसत आहे. याबद्दल बोलताना महापौर म्हणाल्या, “आत्ता तिच्यासोबत फक्त तिची आई आहे. आणि तिचं म्हणणं आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या आरोपीसोबत पीडितेचे गेल्या १२-१३ वर्षांपासून संबंध आहेत, ते दोघे एकमेकांशी परिचित आहेत. आसपासच्या लोकांनी जेव्हा फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की दोघांमध्ये काही भांडणं सुरू आहेत”. या प्रकरणाबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. महापौर म्हणाल्या, “आजकाल समाजातल्या पुरुषांमध्ये क्रूरता वाढताना दिसत आहे. ही क्रूरता का वाढत आहे?”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button