breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; प्रवासी बस-ट्रकची धडक : २० जणांचा मृत्यू

कन्नौज, उत्तर प्रदेश । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेश येथील कन्नौज येथे एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रकमध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला, अशी माहिती मिळाली आहे.
कन्नौज येथील फर्रुखाबाद इथून ही बस जयपूरला जात होती. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कन्नौज इथल्या घिलोई गावानजिक बसची ट्रकशी जोरदार टक्कर होऊन अपघात झाला. टकरीनंतर बसच्या डीझेल टँकने पेट घेतला आणि बसला आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने बसमधील प्रवासी आतच अडकून राहिले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून जखमींना 50 हजार रूपये तर मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. थंडीमुळे पडणारं धुकं हे या अपघातामागील मुख्य कारण असल्याचंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेबद्दल ट्वीट करून दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती दु:ख व्यक्त करतो आणि जखमी नागरिकांनी लवकर बरं होण्याची मी प्रार्थना करतो, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनेबाबत दु:ख व्यक्त केले….
पंतप्रधान मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश के कन्नौज में हुए भीषण सड़क हादसे के बारे में जानकर अत्यंत दुख पहुंचा है। इस दुर्घटना में कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। मैं मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदनाएं प्रकट करता हूं, साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button