breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

ईदनिमित्त घरातच नमाजपठण, मुस्लिम बांधवांनी कोरोनामुक्त देशासाठी अल्लाकडे मागितली दुआ

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

ईद निमित्ताने कुर्बानी दिली जाते, अतिशय पवित्र मार्गाने जे कमविले आहे तेच कुर्बानीच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांनी खर्च करावे, अशी अल्लाहची अपेक्षा असते. या दिवशी खास करून बकर्‍याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी नंतर मास तीन समान हिश्यामध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वतः व शेजारी यांना वाटप करावे लागते. इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबरामध्ये हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळे कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. बकरी ईद सर्वांत मोठ्या सणांमध्ये असून ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव चांगले कपडे परिधान करून सुगंधी अत्तर लावून ईदची नमाज ईदगाह, मशीद व मदरसा येथे सामुहिकरित्या अदा केली जाते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची ईद पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी राज्यशासनाच्या आदेशानूसार घरोघरी नमाज अदा करून साधेपणाने साजरी करण्यात आली. अल्लाह जवळ जगामधून कोरोनाचा प्रादुर्भाव दूर व्हावा, यासाठी दुवा मागण्यात आली.

गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अनेक मुस्लिम बांधवांच्यादेखील हातावर पोट असणार्‍यांच्या नोकर्‍या गेल्या, आर्थिक चणचण, काहींचे छोटे व्यवसाय देखील ठप्प असल्यामुळे यंदाची ईद अतिशय साधेपणाने पारंपारिकरित्या साध्यापद्धतीने साजरी केली. नमाज अदा झाल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या नातेवाईक आदींना मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या, तसेच अनेकांनी मुस्लिम बांधवांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात ईद घरोघरी साजरी करण्यात यावी, यासाठी विविध मशिदीचे मौलाना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हाजी युसुफ कुरेशी, हबीब शेख, गुलामअली भालदार, हजीब गुलाम रसुल, रमजान आत्तार, बंटी मुजावर, इसरार शेख, एजाज शेख, नाशीर शेख, राजू मुलानी, वसीम तांबोळी, मुजाहीद पटवेदार, हाजी ख्वाजा कुरेशी आदी मान्यवरांनी एकमेकांशी संपर्क साधून ईद घरोघरी साजरी करण्याचे आवाहन केले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील इदगाह मैदान, मशिद, मदरसा या परिसरामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button