breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इतका फालतू माणूस पाहिला नाही, निलेश राणे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर गरळ

भाजप – शिवसेना युती झाल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ट्विटरवरून निलेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ अपलोड करत इतका फालतू माणूस पाहिला नाही, अशी टिका केली आहे.

या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राफेलवरुन भाजपावर टीकास्त्र सोडले होते. स्वबळाची भाषा आणि राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेने अखेर भाजपाशी युती केली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजपा २५ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीचा निर्णय झाल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नीलेश राणे यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे दोन व्हिडिओ ट्विट केले आहेत. यातील एका व्हिडिओत उद्धव ठाकरे राफेल करारावरुन मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. या व्हिडिओचा दाखला देत नीलेश राणे म्हणाले, इतका फालतू माणूस पाहिला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button