breaking-newsराष्ट्रिय
‘इंडियाज मोस्ट वॉंटेड’चे प्रसिद्ध निवेदक सुहैब यांची पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषमुक्तता
मुंबई – ‘इंडियाज मोस्ट वॉंटेड’चे प्रसिद्ध निवेदक सुहैब इलियासी यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. १८ वर्षानंतर त्यांना पत्नीच्या हत्येच्या शिक्षेतून दोषमुक्त करण्यात आले आहे.
सुहैब यांची पत्नी अंजूचा इलियासी यांचा मृतदेह ११ जानेवारी २००० साली त्यांच्या घरात संदिग्ध स्वरूपात आढळला होता. अंजूने आत्महत्या केल्याचा दावा सुहैबने केला होता. मात्र, अंजूच्या कुटुंबियांनाही सुहैबने हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा केला होता. यानंतर पोलिसांनी २८ मार्च २००० साली सुहैबला अटक केली. व कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या निर्णयाला सुहैबने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सुहैबला दोषमुक्त केले आहे.