breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आैंध रुग्णालयाच्या कामगार वसाहतीत विद्युत केबल जळाली

पिंपरी –  सांगवी येथील औंध रूग्णालयाच्या कामगार वसाहतीत आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास अचानक वायरने पेट घेतला. त्यामुळे कामगार वसाहतीत राहणा-या नागरिकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने तेथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतू, सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.

सांगवी येथील जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयाच्या कामगार वसाहतीत रहिवाशांनी त्याच भागातील सब डिपीतुन केबल टाकून घरात विद्युत पुरवठा घेतला आहे. आज (बुधवारी) पहाटे पाच सुमारास स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्याचवेळी मुख्य केबल वायर जळाल्याने वसाहतीतील शंभर घरांचा विद्युत पुरवठा बंद पडला. वायरने पेट घेतल्याने  नागरीकांची धांदल उडाली. तात्काळ स्थानिक रहिवाशांनी महावितरण कंपनीस कळविले. या भागातील सब डिपी आणि परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला.  सकाळी महावितरण कर्मचा-यांकडुन येथील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. भल्या सकाळीच विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांची दैनंदिन कामे खोळंबुन राहिली.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. आम्ही घाबरून रस्त्यावर आलो. तेव्हा खांबावरील वायर जळत होती. सगळीकडील लाईट बंद पडल्याने सर्वजण रस्त्यावर आल्याचे तेथील स्थानिक सुकदेव चंडाले यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button