TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शहरात ओमायक्रॉनचा आणखी एक नवीन रुग्ण; शहरात एकूण रुग्णसंख्या 11

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळला. हा रुग्ण महापालिका हद्दीच्या बाहेरील असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 11 रुग्ण आढळले आहेत.आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून आलेल्या लोकांचे पिंपरी चिंचवड शहरात सर्वेक्षण सुरू आहे.विदेशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील एक हजार तीन जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 728 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. विदेशातून आलेल्यांपैकी 19 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील चार जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे.

विदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील सात जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 11 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असून त्यातील 10 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

रविवारी (दि. 19) ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवीन रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण महापालिका हद्दीच्या बाहेरील असून त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकूण 40 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 रुग्ण महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात तर तीन रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. तर 28 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना गृहविलगिकरणात ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button