breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

आर्थिक मदतीनंतर सलमाननं मजुरांना पुरवला धान्यपुरवठा

चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या  २५ हजार कामगारांना आर्थिक मदत पुरवल्यानंतर सलमान खानने आता रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना अन्न धान्य  पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे… सलमानचे मित्र आणि काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे ज्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे अशा कुटुंबीयांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी सलमान खान प्रयत्न करत आहे. ‘ गरजूंना मदत करण्यासाठी तू नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतो’ असं, कौतुकही बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवर केलं आहे.

याव्यतिरिक्त सलमाननं राधे या चित्रपटासाठी काम करणाऱ्या क्रू मेंबरच्या खात्यातही पैसे जमा केले आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘राधे युअर मोस्ट वाँटेड भाई’चं चित्रीकरण २६ मार्च ते २ एप्रिल या काळात होणार होतं. चित्रीकरणाचं वेळापत्रक फार पूर्वीच ठरलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण झालं नाही. पण सलमाननं २६ मार्च ते २ एप्रिल या काळातील  क्रू मेंबरचं मानधन त्यांच्या खात्यात जमा केलं होतं. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button