breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आम्ही 80 वर्षाच्या योध्यासोबत !’ पिंपळे सौदागरमध्ये झळकले ‘फ्लेक्स’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अजितदादा जरी भाजपसोबत गेले असले तरी बारामतीत आम्ही साहेबांसोबत असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे घडली आहे.

पिंपळे सौदागर येथे ”आम्ही 80 वर्षाच्या योध्यासोबत !” अशा आशयाचे फ्लेक्स झळकत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे फ्लेक्स लावले आहेत. त्यावर संतोष हांडे, गणेश कापसे आणि मित्र परिवार अशी नावे आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून आता शरद पवार यांनाच पाठिंबा मिळत आहे. निवडून आलेले आमदार देखील पवार साहेबांसोबत असल्याचे सांगत आहेत. असे असताना अजित पवार कोणाच्या आधारावर भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी होत आहेत, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर बारामतीत असे फ्लेक्स झळकले. बारामती हा अजित पवार यांचा मतदार संघ आहे. याठिकाणी दादांना माणनारा वर्ग मोठा असून तेथील मतदारांनी सुध्दा दादांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तरी, आम्ही साहेबांसोबतच असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार यांचे नाते देखील तेवढे गहण आहे. येथील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये दादांविषयीची नेतृत्वाची भावना अधिक दृढ आहे. बारामतीनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये देखील अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा न दर्षविता आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत म्हणजेच पवारसाहेबांसोबत असल्याचा नारा दिला आहे. तसे, फ्लेक्स पिंपळे सौदागरमध्ये झळकत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button