breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार महेश लांडगे यांचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’…खासदार डॉ. कोल्हे यांचे केले अभिनंदन

पिंपरी । महा-ई-न्यूज ।
लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीची लढाई ही विचारांची असते. निवडणूक संपली की एकमेकांमधील वाद-विरोध संपला. सर्वांनी एका दिलाने काम केले पाहिजे, असे अपेक्षीत असते. या संकल्पनेतूनच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ हे आदर्शवत अभियान हाती घेतले. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आली. विरोधी पक्षाचे असतानाही नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाबद्दल जाहीरपणे अभिनंदन करुन आमदार लांडगे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
वास्तविक, शिरुरचे मावळते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आमदार महेश लांडगे यांची ओळख होती. मात्र, महायुतीच्या धर्माचे पालन करीत लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्यासाठी जोरदार काम केले. भोसरी विधानसभा मतदार संघातून आढळराव यांना ३७ हजारांचे मताधिक्यही मिळवून दिले. तरीही अन्य विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळाली नाही. परिणामी, आढळराव पाटील यांचा पराभव झाला. देशभरात भाजपने विजयरथ खेचून आणला, तरीही भोसरीत आमदार लांडगे समर्थकांनी जल्लोष केला नाही. कारण, शिरुरची जागा ‘युती’ला गमवावी लागली होती.
दरम्यान, ‘सोशल मीडिया’वर आमदार लांडगे यांनी विरोधी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे लक्षवेधी विजयाबद्दल जाहीरपणे आभार मानले आहेत. ‘आमचा गड आला…पण सिंह गेला’ अशी खंतही त्यांनी ‘त्या’ पोस्टद्वारे बोलून दाखवली आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ या संकल्पनेचे कौतूक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button