breaking-newsपिंपरी / चिंचवड

आनंदनगरच्या रस्ता डांबरीकरणाचे ऑडीट करा

जुन्या रस्त्यावर डांबराचा मुलामा देवून ठेकेदाराकडून महापालिकेची फसवणुक
पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवडच्या आनंदनगरमधील डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावर ठेकेदाराने डांबर टाकून त्यावर दगडाचा चुरा टाकून रोडरोलर फिरविला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचे डांबरीकरणाचे आॅडीट करावे, अशी मागणी ज्ञानेश्वर सिद्राम इटकल यांनी केली आहे. 
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या एक महिन्यापूर्वी आनंदनगर मधील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम करण्यात आले आहे. सदरील डांबरीकरण झाल्यानंतर सर्व रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडले आहेत. संबंधीत ठेकेदाराने प्रचलीत नियमानुसार शेड्युल बी नुसार काम न करता जुन्या रस्त्याला फक्त डांबराचा रंग, मुलामा मारला आहे. सदर रस्त्यावर ठेकेदाराने डांबर टाकून त्यावर कच म्हणजे दगडाचा चुरा टाकून त्यावर रोडरोलर फिरविण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून महिन्यातच सर्व रस्ते उखडलेले आहेत. संबंधीत ठेकेदाराने जुन्या रस्त्यावरच फक्त डांबराचा मुलामा देवून महापालिका आणि नागरिकांची दिशाभूल केली आहे.
तसेच सदरील ठिकाणी ठेकेदाराने मनपाची तसेच जनतेची फसवणुक केलेली आहे. तसेच मनपाचे संबंधीत विभागातील अधिकारी यांनी ठेकेदाराला मदत केली आहे. रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराची सर्व बिले त्वरीत थांबविण्यात यावी. या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या प्रत्येक कामाचे ऑडीट व्हावे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी, असेही इटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button