breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

‘आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन’, आयुक्त तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

नागपूर: नागरिक आणि प्रशासन साथीरोगाचा सामना करत असताना कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचे प्रकार घडत आहेत. नागपूरमध्ये  देखील असेच प्रकार समोर आल्यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोषी रुग्णालयांना चांगलाच दणका दिलेला आहे. तुकाराम मुंढेंनी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या नागपूरमधील व्होकार्ट रुग्णालयाला 2 दिवसांमध्ये संबंधित रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पीडित रुग्णांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे अतिरिक्त शुल्क आकारल्याची तक्रार केली होती. यानंतर आयुक्त मुंढे यांनी प्रथम संबंधित व्होकार्ट रुग्णालयाला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होते. मात्र, रुग्णालयाच्या स्पष्टीकरणात समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने तुकाराम मुंढे यांनी तात्काळ अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी दोषी रुग्णालयाला दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. अन्यथा कडक कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button